भंगारच्या गोदामाला आग
फातिमानगर परिसरातील घटना
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) ः भिवंडी शहरातील फातिमानगर परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला रविवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. गोदामात प्लॅस्टिक, कापडी चिंध्या व इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्यामुळे आग वेगाने पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि शांतीनगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने प्रयत्न करत सुमारे एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.