मुंबई

बुरखाधारी महिलांचा जुगार अड्ड्यांवर छापा

CD

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा बेकायदा ‘मटका’ जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट वाढल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी पोलिसांच्या कारवाईमुळे बंद पडलेले अड्डे पुन्हा सुरू झाल्याचे समोर आले. परिस्थिती चिघळल्याने स्थानिक महिलांनी पुढाकार घेत थेट एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत अवैध धंद्याचे पितळ उघडे पाडले. याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून महिलांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
भिवंडी शहरासह परिसरात गांजा, मटका, हुक्का, गुटखा आणि एमडी पावडर यांसारख्या नशेच्या पदार्थांचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ओढली जात आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मतदारसंघातच जुगार अड्ड्यांचे जाळे पुन्हा सक्रिय झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मात्र बुरखाधारी महिलांच्या गटाने थेट अवचित पाड्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून, तो समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्याने स्थानिक पोलिस प्रशासन चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
आंदोलन करणाऱ्या महिलांनी, जुगाराच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती ढासळत आहे. परिसरातील अनेक पुरुष आपली महिन्याची कमाई या अड्ड्यांवर खर्च करतात, ज्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. तसेच, जुगार अड्ड्यांच्या आसपास अमली पदार्थांचे व्यसनी आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढल्याने महिला व तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर महिलांनी शांतीनगर पोलिस ठाणे आणि भिवंडीचे पोलिस उपायुक्त यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. लवकरात लवकर अड्ड्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT