मुंबई

धरणाच्या सावलीत तहान

CD

कासा, ता. १२ (बातमीदार) : हाकेच्या अंतरावर धरण असूनही गावकऱ्यांच्या घशाला पाणी नाही, अशी विरोधाभासी परिस्थिती सध्या डहाणूतील धामणी-आंबेघर परिसरात निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार आणि मिरा-भाईंदर महापालिकांची तहान भागवणाऱ्या धामणी धरणाच्या आसपासच असलेल्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करत आहे.

धामणी-आंबेघर ग्रामपंचायतीतील गाव-पाड्यांमध्ये सुमारे सतराशेहून अधिक लोकसंख्या असून गावठाण पाडा, हणपाडा, भावरपाडा, बरगलपाडा, खोरीपाडा आदी भागांतील विहिरी व बोअरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज दूर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी थोडेफार पाणी उपलब्ध असले तरी ते दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डहाणू, विक्रमगड आणि जव्हार या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या या भागात दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत पाणीटंचाई तीव्र होते. सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणातून बोईसर-तारापूर एमआयडीसी, तसेच वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहरांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो; मात्र धरणाच्या शेजारील गावांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तरीही नियोजनाच्या अभावामुळे काही महिन्यांतच पाण्याची टंचाई निर्माण होते, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

‘जलजीवन’चे काम रखडले
केंद्र सरकारची ‘जलजीवन मिशन’ या भागात अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसून तिचे काम अर्धवट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी विहिरी अपूर्ण, तर जलवाहिनीदेखील अर्धवट खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने सहन कराव्या लागत आहेत.

बोअरवेलला पाणी नाही
स्थानिक महिलांनीही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी आल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर-दऱ्यांतून लांब अंतर चालत जावे लागते. ग्रामपंचायतीने बोअरवेल उभारल्या; पण त्यातून पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याने महिलांचे हाल होत आहेत, अशी व्यथा रेखा हन यांनी व्यक्त केली.

धरण शेजारी असूनही अनेक पाड्यांतील नागरिकांना दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागते. बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ‘जलजीवन मिशन’चे काम अर्धवट आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.
- रवींद्र भोगडे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

SCROLL FOR NEXT