मुंबई

कुंभा डोंगर परिसरात लोकसहभागातून बहरणार निसर्ग

CD

कुंभा डोंगर परिसरात लोकसहभागातून बहरणार निसर्ग
वैतागवाडीकडून ‘धरतरी पालथा’ उपक्रमाचे आयोजन

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे जतन ही काळाची गरज ओळखत विक्रमगड तालुक्यातील खुडेद पैकी ग्रामसभा वैतागवाडीने एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. वयम चळवळीच्या प्रेरणेतून ‘धरतरी पालथा’ या नावाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत कुंभा डोंगर परिसरात वृक्षारोपण व बीजारोपणासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले.

कुंभा डोंगर हा परिसर सामूहिक वनहक्क क्षेत्रात येत असून, येथील नैसर्गिक समृद्धी टिकवण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला आहे. वाढत्या तापमान, पावसातील अनियमितता आणि जंगलतोड यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. वैतागवाडी ग्रामसभेतील ग्रामस्थांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि डोंगरावरील हिरवळ पुन्हा वाढवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ‘धरतरी पालथा’ या उपक्रमाअंतर्गत काजू, जांभूळ, मोहटी, आंबा यांसारख्या स्थानिक फळझाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात येत असून, बांबू तसेच विविध औषधी वनस्पतींची लागवडही केली जाणार आहे.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण काम ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणेने आणि श्रमदानातून पार पडत आहे. ‘आपला डोंगर, आपला निसर्ग’ या भावनेतून ग्रामस्थांनी एकत्र येत हा परिसर सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेचा मुख्य टप्पा म्हणून शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत कुंभा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले. ग्रामस्थांनी एकदिलाने सहभाग घेत, भविष्यातील वृक्षलागवडीसाठी आवश्यक तयारी पूर्ण केली. यानंतर दुपारी २ वाजता सर्वांनी एकत्र येत सामूहिक भोजनाचा कार्यक्रमही पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकात्मता आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या उपक्रमासाठी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, विक्रमगड येथील वनरक्षक रवींद्र राऊत, प्रदीप भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मधुकरजी मालकरी, केशवसृष्टी संस्थेचे विक्रमगड विस्तारक गणपतजी धांगडा, दिलीपजी पावरा, जव्हार विस्तारक संजय दाव्हाड यांच्यासह वयम् चळवळीचे कार्यकर्ते प्रकाश बरफ, रवींद्र पवार, नामदेव टोकरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय धरतरी ग्रुपचे किरण लोहार, वसंत तुंबडा, अमर गोविंद तसेच पेसा गावातील कातकरीपाडा व वांगनपाडा येथील ग्रामस्थ, वैतागवाडी ग्रामसभा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
पर्यावरण जागरूकतेचा नवा आदर्श

‘धरतरी पालथा’ या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, लोकसहभागातून निसर्ग जपण्याचा एक आदर्श निर्माण झाला आहे. भविष्यात कुंभा डोंगर पुन्हा एकदा हिरवागार, फळाफुलांनी बहरलेला आणि जैवविविधतेने समृद्ध झालेला पाहायला मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागात पर्यावरणाबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा एक व्यापक लोकचळवळ ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

SCROLL FOR NEXT