वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात वाहन खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे आरटीओच्या महसुलातही मोठी भर पडली आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सुविधा यामुळे नागरिकांचा खासगी वाहनांकडे ओढा वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईत २००४ पासून आतापर्यंत सुमारे सात लाख ६१ हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. सध्या शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या आसपास पोहोचली असून, त्याच प्रमाणात वाहनसंख्याही वाढत आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत वाढते औद्योगिकीकरण आणि विस्तारणारे रस्ते जाळे यामुळे खासगी वाहनांचा वापर अधिक वाढला आहे. रेल्वे, बेस्ट, एनएमएमटी, रिक्षा असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध असतानाही, नागरिक मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांना पसंती देत आहेत. पनवेल, ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या भागांमधून नोकरी व व्यवसायासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक नवी मुंबईत ये-जा करतात; मात्र सार्वजनिक वाहतुकीतील अपुऱ्या सुविधा आणि गर्दीमुळे अनेक जण स्वतःची वाहने वापरणे अधिक सोयीचे मानत आहेत.
वाहन खरेदीसाठी सुलभ कर्जव्यवस्था, आकर्षक ऑफर्स आणि वाढती क्रयशक्ती यामुळेही वाहन खरेदीत वाढ होत आहे. शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी, ऑटो रिक्षा, तसेच खासगी पर्यटक बस यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
नवी मुंबईमध्ये वाहन नोंदणीमध्ये सातत्याने वाढ होत असून, यामागे शहराचा वेगाने होत असलेला विकास ही प्रमुख कारणे आहेत. सुलभ कर्जप्रणालीमुळे वाहन खरेदी करणे सोपे झाले आहे. तसेच शहरातील दळणवळणाच्या गरजांमुळे खासगी वाहनांचा वापर वाढत आहे. रस्ते सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि प्रदूषण नियंत्रण यावरही आम्ही विशेष भर देत आहोत.
- गजानन गावंडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
शहरातील वाहनांची आकडेवारी
वर्ष वाहनांची विक्री महसूल (कोटींमध्ये)
२०१७-१८ ४१,९०१ २६९.१५
२०१८-१९ ४३,०४५ २६८.२८
२०१९-२० २६,४६० २४५
२०२०-२१ २४,३५८ १७४.६०
२०२२-२३ ३६,६६१ ३३९.६०
२०२३-२४ ३९,२९६ ३५७.५२
२०२४-२५ ४०,१९९ ३९२.४८
२०२५-२६ ४८,१९६ ४२६.३४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.