श्रीवर्धनची बदनामी भोवली
मुकुल साबळे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
श्रीवर्धन, ता. १२ (वार्ताहर) ः श्रीवर्धन शहराची आणि येथील स्थानिक तरुणांची सामाजिक माध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील मुकुल साबळे यावर श्रीवर्धन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ काल्पनिक माहिती पसरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर (टाकळी भान) येथील काही तरुण श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आले होते. यादरम्यान, स्थानिक तरुण आणि पर्यटक यांच्यात आंबे चोरीच्या संशयावरून वाद झाला होता. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाले होते. मात्र, मुकुल साबळे याने पर्यटकांच्या हातातील नोटांची बंडले बघून स्थानिकांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आणि विरोध केल्यावर मारहाण करून दागिने चोरले, अशी टिप्पणी सामाजिक माध्यमावर केली होती.
दरम्यान, घटनेची कुठलीही खातरजमा न करता काल्पनिकरीत्या श्रीवर्धन येथील तरुणांची बदनामी केल्याप्रकरणी जीवनेश्वर पाखाडी येथील पर्यटन व्यावसायिक नीलेश कर्णेकर यांनी गुरुवारी (ता. ११) श्रीवर्धन पोलिस ठाण्यात मुकुल साबळेविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.