मुंबई

श्रीवर्धन येथे चोर्यांंच्या घटनांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण

CD

श्रीवर्धन येथे चोरट्यांचा सुळसुळाट
वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीवर्धन, ता. १२ (वार्ताहर) ः शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. वाढत्या चोऱ्या आणि चोरट्यांचा रात्रीचा वावर या पार्श्वभूमीवर नागरिकांनी श्रीवर्धन पोलिस ठाण्याला धडक देत निवेदन दिले. तसेच, डोंगराळ भागात लपून बसलेल्या चोरट्यांचा छडा लावण्यासाठी ड्रोन वापरण्याची परवानगी या वेळी नागरिकांनी मागितली आहे.
गेल्या आठवड्यात विठ्ठल आळी येथील सुरेश कर्णेकर यांच्या घरातून दागिने व रोकड लंपास केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा आता डोंगर लगतच्या वस्त्यांकडे वळवला आहे. शनिवारी (ता. १०) रात्री विठ्ठल आळी व बंदर गोठण भागात चोरट्यांनी घरांचे दरवाजे ठोठावून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हातात लोखंडी सळई आणि हत्यारे असलेल्या चोरट्यांना पाहून रहिवाशांनी आरडाओरडा केल्याने चोरटे डोंगराच्या दिशेने पसार झाले. पंधरा दिवसांपूर्वी साळीवाडा येथील चाळीतही चोरीची घटना घडली होती. या घटनांमुळे नागरिकांनी पोलिस ठाणे गाठत समस्यांचा पाढा वाचला. यानुसार संबंधित भागात गस्तही सुरू करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीचा वाद
श्रीवर्धन नगर परिषदेमार्फत शहरात ९५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी दोन नादुरुस्त आहेत, असा कंपनीने खुलासा केला आहे, तर नागरिकांच्या मते अनेक कॅमेरे नादुरुस्त आहेत. पोलिस ठाण्यातून ही कॅमेऱ्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदेने खुलासा केला आहे की चोरीच्या तपशीलाबाबत सीसीटीव्ही फुटेज दिले आहेत.

नागरिकांची ड्रोनची मागणी
चोरटे हे डोंगराच्या दिशेने पळून जात असल्याने त्यांचा मुक्काम डोंगरावर असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. सायंकाळच्या दरम्यान डोंगर परिसरातील झाडाझडती घेण्यासाठी आम्हाला ड्रोनची परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या वेळी पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी नॅनो ड्रोन वापरण्याची परवानगी दिली आहे.

(फोटो - पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देताना नागरिक.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Pune Property Tax Rush: महापालिकेची ऑनलाइन सिस्टीम कोलमडली, सॉफ्टवेअर अपडेटचा अभाव उघड; ९० कोटींची करवसुली, उद्या १०० कोटींपर्यंत अपेक्षा

Maharashtra Activists Honoured: महा अंनिस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व जातमुक्ती चळवळीत उल्लेखनीय योगदानाचा सन्मान

Leopard Attack : गंगापूर तालुक्यात बिबट्याचा कहर वाढला; भेंडाळा शिवारात कुत्रा ठार, शेतकरी भयभीत, तातडीने बिबट्या पकडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT