मुंबई

अंबरनाथचा बाजार रानमेव्यांनी फुलला

CD

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : उन्हाळ्याची चाहूल लागताच अंबरनाथच्या बाजारपेठेत रानमेव्याची रंगत खुलली आहे. करवंद (काळी मैना), कैरी, चिंच, काजू यांसह विविध फळांनी बाजारपेठ गजबजून गेली आहे. आंबट-गोड चवीच्या ताज्या करवंदांसह कैरी व चिंच खरेदीसाठी ग्राहक पसंती देत आहे. कर्जत तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी या हंगामामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे.
डोंगरदऱ्या, कड्याकपारी व जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणारा रानमेवा गोळा करण्यासाठी या महिला पहाटेपासूनच घराबाहेर पडतात. काटेरी झुडपांतून व कठीण वाटा पार करत जीवाची पर्वा न करता करवंद व इतर फळे गोळा करतात. कर्जत, नेरळ आणि माथेरानच्या डोंगरदऱ्यांतून गोळा केलेला हा रानमेवा अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसह आसपासच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणला जातो. बाजारात पळसाच्या डोमात आकर्षक पद्धतीने सजवलेली करवंदे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. २० रुपयांना एक वाटा तर ५० रुपयांत तीन वाटे अशा दरात विक्री होत आहे. विशेष म्हणजे, हा रानमेवा ग्राहकांसाठी आरोग्यदायी पर्याय ठरत आहे. कैऱ्या, चिंच, पेरू, काजू, पपई, फणस तसेच विविध भाज्यांची विक्री या महिलांकडून केली जाते.

आदिवासी महिलांना रोजगाराचा आधार
कैरी-करवंदांच्या चटण्या, लोणची आणि सरबतासाठी स्थानिकांमध्ये मोठी मागणी असल्याने या रानमेव्याची मागणी वाढत आहे. परिणामी, या हंगामात आदिवासी महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. त्यामुळे हा हंगाम आदिवासी भागासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

अंबरनाथ : बाजारात आदिवासी महिलांनी रानमेवा विक्रीसाठी आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT