मुंबई

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी खेळायचं कुठे

CD

उन्हाळी सुट्टीत हिरमोड
घरकुल वसाहतीतील उद्यानांची दुरवस्था
खारघर, ता. १३ (बातमीदार) : उद्यानातील खेळणी मोडकळीस आल्यामुळे सुरक्षित खेळण्यासाठी पर्याय नसल्याची गंभीर समस्या खारघरमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, हक्काची जागा नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा हिरमोड होत आहे.
खारघर वसाहतीतील सिडकोचा पहिला गृहप्रकल्प म्हणून सेक्टर १५ मधील घरकुल वसाहतीची ओळख आहे. सिडकोने २००० मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी उभारलेल्या वसाहतीत महालक्ष्मी, कुंजविहार, मातृछाया संस्था, मकरंद आदी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुमारे १,३९२ सदनिका आहेत. मात्र, या परिसरातील उद्याने जीर्ण अवस्थेत असून, काही ठिकाणी तुटलेली खेळणी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना उद्यानात खेळण्यासाठी पाठवणे कमी केले आहे. परिणामी, मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासावर परिणाम होत आहे. या उद्यानांची पालिकेकडून नियमित देखभाल होत नसल्यामुळे अशी अवस्था झाली आहे.
-------------------
शिल्पांची दुरवस्था
खारघर सेक्टर ११ मध्ये वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या नानानानी पार्कमध्ये नागरिकांची वर्दळ असते. मात्र, या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानाच्या एका बाजूला चिखल झाला आहे. वीज पेटी उघड्या अवस्थेत आहे. तसेच उद्यानातील डायनासोरची शिल्पे मोडकळीस आली आहेत.
-----------------------
लोकप्रतिनिधींची पाठ
पालिका निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी दारात येऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करीत होते. मात्र, निवडणुकानंतर विजयी उमेदवारांनी पाठ फिरवली आहे. घरकुल वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली असून, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष चर्चेचा विषय बनला आहे.
------------------
उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे उद्यानात मुले खेळण्यास येणार यात शंका नाही. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्याना भेटून खेळणीची दुरुस्ती चर्चा केली आहे.
-समीर कदम, नगरसेवक
--------------------
घरकुलमधील समस्यांविषयी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर सिडकोने उद्यान विकसित करून खेळणी उपलब्ध करून दिली होती, पण पालिकेने उद्यानांकडे दुर्लक्ष केले आहे.
- ॲड. जे.पी. खारगे, रहिवासी
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT