मुंबई

''अभी ना जावो छोड कर...'' आशा भोसलेंना गाण्यातून श्रद्धांजली

CD

अभी ना जाओ छोड कर..!
आशा भोसलेंना गाण्यातून वाहिली स्वरांजली
मुंबई, ता. १३ ः सूरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी ज्येष्ठ गायक सुदेश भोसले, अनुप जलोटा, शान यांनी गाणी गात आशाताईंना अनोखी स्वरांजली वाहिली.
गायक सुदेश भोसले यांनी ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या होगा किसने जाना’ या गाण्याने आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘अभी ना जाओ छोडकर दिल अभी भरा नहीं’ या गाण्यासह मराठीतील प्रसिद्ध गाणे ‘जीवलगा राहिले रे, दूर घर माझे, पाऊल थकले जड झाले ओझे...’ हे गाणे गात आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. भजनसम्राट अनुप जलोटा यांनी संत कबीरदास यांचे प्रसिद्ध काव्य ‘उड़ जाएगा हंस अकेला, दो दिन का दर्शन मेला... राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा, चेला...’ सादर केले. त्यापाठोपाठ गायक शान यांनी ‘प्यार के मोड़ पर मिल गए हो अगर, हमसे मिलने मिलाने का वादा करो...’ गीत सादर केले. गायकांनी सादर केलेल्या या स्वरांजलीने उपस्थितही भारावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Mumbai: दुधासाठी चिमुकला रडला, दारुड्या बापाचा संताप पेटला, रागात मुलाला अमानुष मारहाण, दरवाजावर धाडकन आपटलं अन्...; मुंबईत खळबळ

NCP Sangli-Satara: शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांची नावे आघाडीवर; ‘सांगली- सातारा’ची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे, उमेदवारीवर उत्सुकता

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT