मुंबई

पुस्तकांतून भेटले बाबासाहेब

CD

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इंदगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक आगळावेगळा आणि विचारप्रवर्तक उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक औपचारिक कार्यक्रमांऐवजी विद्यार्थ्यांनी ‘वाचनातून जयंती साजरी’ करण्याचा अभिनव संकल्प प्रत्यक्षात उतरवत सर्वांचे लक्ष वेधले.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक तास बाबासाहेबांच्या जीवनचरित्रांवर आधारित ग्रंथांसह विविध ज्ञानवर्धक व प्रेरणादायी पुस्तके एकाग्रतेने वाचली. शाळेच्या परिसरात निर्माण झालेले शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण विद्यार्थ्यांसाठी समृद्ध अनुभव ठरले. वाचनाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नव्या जाणिवा जागृत झाल्या. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आत्मसात केला. मुख्याध्यापक अमोल राजेंद्र पेन्सलवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच विचारशक्ती आणि सामाजिक जाणही विकसित होत असल्याचे दिसून आले.

सकारात्मक संदेश
आजच्या डिजिटल युगात पुस्तकांपासून दुरावत चाललेल्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्याचा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते सजग, विचारशील आणि जबाबदार नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. इंदगाव शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.

बदलापूर : इंदगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रांवर आधारित पुस्तकांचे वाचन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT