खालापूर पोलिस ठाण्यात महामानवाला अभिवादन
वन विभागाकडून महिला कर्मचाऱ्यांना प्रतिमा पूजनाचा मान
खालापूर, ता. १४ (बातमीदार)ः खालापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. वन विभाग कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांना प्रतिमा पूजेचा मान देण्यात आला.
खालापूर पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन भालेराव, मनीष मोरे, माजी उपनगराध्यक्ष संतोष जंगम, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, अमित गुजरे, पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विशाल नेहुल यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तहसीलदार अभय चव्हाण यांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समता व स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.