मुंबई

एमएमआरमध्ये भुयारी मार्ग, पायाभूत सुविधांच्या उभारणीला ऑस्ट्रीयाचे सहकार्य

CD

भुयारी मार्ग, पायाभूत सुविधा उभारणार
ऑस्ट्रियाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून एमएमआरडीएला एलओआय सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) भुयारी मार्गाबरोबरच वेगवेगळ्या भुयारी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. त्यासाठी एमएमआरडीएला आता ऑस्ट्रियाचे सहकार्य मिळणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रियाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून एमएमआरडीएला आशय पत्र (लेटर ऑफ इंटेंट) दिले आहे. पायाभूत सुविधांशिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नवोन्मेष, शैक्षणिक व संस्थात्मक सहकार्य, आर्थिक सहकार्य व औद्योगिक भागीदारी आदींबाबतही सहकार्य मिळणार आहे.
एमएमआरडीएकडून एमएमआर क्षेत्राचा कायापालट केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियाच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने सोमवारी एमएमआरडीएच्या कार्यालयात आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिनिधी मंडळाशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना ऑस्ट्रियन संस्था आणि कंपन्यांना महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा विकास, नवोपक्रम आणि शाश्वत नागरी विकासात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. तसेच महाराष्ट्राला एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स अर्थव्यवस्था बनविण्याच्या दृष्टिकोनावरही प्रकाश टाकला. ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळात त्यांचे ऊर्जा आणि पर्यटन मंत्री वोल्फगँग हॅटमनसडॉर्फर, भारतातील ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झिश्ग यांच्यासह ऑस्ट्रियन फेडरल मंत्रालय, ॲडव्हांटेज ऑस्ट्रिया, ऑस्ट्रियन फेडरल इकॉनॉमिक चेंबर, ऑस्ट्रियन विद्यापीठे आणि आघाडीच्या कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासाच्या प्रमाणामुळे जागतिक भागीदारांचा वाढता रस दिसून येत आहे. डावोस येथे मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर अनेक देश आणि संस्था आमच्यासोबत सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
़़़़
या क्षेत्रात सहकार्याची इच्छा
- भुयारी मार्ग व भूमिगत पायाभूत सुविधा क्षेत्रातील कौशल्य विकास
- तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नवोन्मेष
- शैक्षणिक व संस्थात्मक सहकार्य
- आर्थिक सहकार्य व औद्योगिक भागीदारी
- पर्यटन विकास
- भविष्यातील औपचारिक सहकार्यासाठी चौकट विकसित करणे
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT