आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विकसकाला जामीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय माचिंदरला नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. खटल्याला सुरुवातीपासून झालेला विलंब आणि माचिंदरच्या कोठडीतील कालावधी लक्षात घेता, त्याला आणखी काहीकाळ तुरुंगात डांबून ठेवणे समर्थनीय नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नमूद केले.
न्या. अश्विन भोबे यांनी माचिंदरने दाखल केलेला जामीन अर्ज मंजूर करताना पाच लाख रुपयांच्या मुचलक्यासह हमीदार सादर करण्याचे आदेश दिले. अर्जदार हा केवळ दीर्घकालीन कारावासाच्या आणि खटल्याच्या सुरुवातीस झालेल्या विलंबाच्या एकमेव कारणास्तव जामिनास पात्र ठरत असून, खटला प्रलंबित असताना अर्जदाराला आणखी कोठडीत ठेवणे आवश्यक नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. जरी ईडी खटल्याच्या विलंबाला जबाबदार नसली तरीही हा विलंब अर्जदारामुळे झाल्याचे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा त्यांना सादर केलेला नाही. तसेच, कोठडीत असताना खटल्याच्या कामकाजात विलंब झाल्याचा कोणताही फायदा आरोपीला होणार नसल्याचेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. तत्पूर्वी, अर्जदार दोषी आढळल्यास जास्तीत जास्त सात वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र आहे. तो दोन वर्षांहून अधिक काळ कारावासात असल्याची बाब माचिंदरकडून ॲड. संदीप कर्णिक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.