दस्त नोंदणीतून विक्रमाला गवसणी
मुद्रांक शुल्क विभागाला सोळाशे कोंटीचा महसूल
मनोर, ता. १५ ः राज्य शासनाने पालघर जिल्ह्यासाठी १,५५० कोटींचा महसूल गोळा करण्याचा इष्टांक दिला होता, पण मुद्रांक शुल्क विभागाने सरत्या आर्थिक वर्षात१,६४८ कोटी राज्याच्या तिजोरीत जमा केले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा दीडशे कोटी रुपये अधिकचा महसूल मिळवला आहे.
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर, विमानतळासारखे नवनवीन प्रकल्प येऊ घातल्याने आगामी काळात मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ होणार आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात पालघर जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाकडे ९१ हजार २९९ दस्तऐवज नोंदणीतून १६४८.६९ कोटींचा महसूल गोळा करण्यात आला.
---------------------
जिल्ह्याच्या विकासात हातभार
जिल्हा प्रशासन, मुद्रांक शुल्क विभागाने नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन सुविधा, जनजागृतीमुळे करदात्यांचा सहभाग वाढला आहे. तसेच राष्ट्रीय प्रकल्पामुळे मुद्रांक वसुली लक्षणीय वाढली असून, महसुलातील वाढ जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणार आहे.
-------------------------
पालघर जिल्ह्यात मुंबई-बडोदा दृतगती महामार्ग, बुलेट ट्रेन, लोकल रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, विरार अलिबाग कॉरिडॉर, वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, विमानतळाच्या घोषणेमुळे दस्त नोंदणीची संख्येत वाढ झाली आहे. भविष्यात दस्त नोंदणीत वाढ होणार आहे.
- प्राची घोलप, मुद्रांक जिल्हाधिकारी, पालघर
-----------------------
वर्ष इष्टांक दस्तसंख्या वसूल रक्कम टक्केवारी
२०२३-२४ १४५० ७०,५९५ १२५२.९९ ८६.०४%
२०२४-२५ १५५० ९६,४५४ १४९८.३४ ९६.६६%
२०२५-२६ १५५० ९१,२९९ १६४८.६९ १०६.३४%
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.