मुंबई

शंकर फकीर पाटील विद्यालय नामकरण

CD

आबिटघर विद्यालयाचे नामकरण
शंकर पाटील यांच्या परिवाराकडून भरीव देणगी
वाडा, ता. १५ (बातमीदार)ः तालुक्यातील आबिटघर विद्यालयाचे शंकर फकीर पाटील विद्यालय असे नामकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, ज्येष्ठ समाजनेते परशराम सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, पंचायत समिती माजी सभापती जगदीश पाटील, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ वेखंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शंकर फकीर पाटील वाडा पंचायत समितीचे पहिले सभापती होते. उच्चविद्याविभूषित शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक होता. शंकर पाटील यांनी महाविद्यालयाला दोन एकर जमीन दान दिली. मात्र, काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. आता त्यांचे पुत्र तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष विकास शंकर पाटील, संस्थापक, नामवंत वकील ॲड. प्रकाश पाटील, सुनबाई, संस्थेच्या सदस्या संध्या सुहास पाटील, मुलगी मुग्धा प्रकाश पाटील ऊर्फ मुग्धा देसाई यांनी विद्यालयाला एक कोटी ५० हजारांची भरीव मदत केली आहे. त्यामुळे विद्यालयाचे नाव पुनर्स्थापित करण्यात आले आहे.
--------------------------
कार्याचा गौरव
आबिटघर विद्या प्रसारक मंडळाकडून विद्यालय चालवण्यात येत होते. विद्यालयाची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली आहे. या वेळी महिला मंडळाच्या नावे विद्यालयाची मंजुरी घेण्यात आली होती. त्यांचे नाव विद्यालयाला दिल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT