मुंबई

वसईतील खेळाडूंचे कार्य अभिमानस्पद

CD

वसईच्या दारीस डाबरेचा सुवर्णवेध
शरीर सौष्ठवच्या राष्ट्रीय स्पर्धेत यशाला गवसणी
वसई, ता. १५ (बातमीदार)ः मेहनतीच्या जोरावर शरीर सौष्ठवच्या राष्ट्रीय स्पर्धेत वसईतील दारिस डाबरेने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या यशाचे वसईकरांकडून भरभरून कौतुक होत आहे.
वसई-विरार शहरातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर चकमदार कामगिरी करत आहेत.
नुकताच इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आयोजित ज्युनियर मास्टर नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत वसईच्या नानभाट येथील दारीसने पिळदार शरीरयष्टीने उपस्थितांची मने जिंकली होती. त्याच्या कामगिरीबाबत महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला. या वेळी दारीसने शहराचा अभिमान उंचावला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिली, तर दारीसच्या यशामुळे वसईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.
--------------------------
वसई तालुका कला क्रीडा महोत्सवातील शरीर सौष्ठव स्पर्धेमुळे व्यायामाकडे लक्ष केंद्रित केले. त्यानंतर स्पर्धेत सहभाग घेऊ लागलो. प्रशिक्षक, आई-वडील, बहिणीच्या पाठिब्यांमुळे यश मिळवले.
- दारीस डाबरे, स्पर्धक
--------------------
वसई तालुक्यात खेळाडू विविध खेळात यश मिळवत आहेत. मुलाला व्यायामाची आवड होती. त्याने मिळवलेले सुवर्णपदक मिळवले हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
- दिलीप डाबरे, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

Online Fertilizer Sales : ऑनलाईन खत विक्रीमुळे शेतकरी मेटाकुटीस; राज्यातून फक्त दोनच जिल्हयांसाठी जाचक अटी

CJP Pune Protest: जंतरमंतर नंतर कॉकरोच जनता पक्ष पुण्यात आंदोलन करणार! कधी आणि कुठे? पार्टीने तारीख आणि ठिकाण सांगितलं

Latest Marathi News Update : राज्यासह देशात काय घडलं? जाणून घ्या...

Sakal Auto Expo 2026 : ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ १३ व १४ जूनला; वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

SCROLL FOR NEXT