IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

India A Tri-Series in Sri Lanka: भारतीय अ संघाला श्रीलंकेत तिरंगी वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीही भारताच्या अ संघाचा भाग आहे. या मालिकेतील सामने कुठे पाहाता येतील जाणून घ्या.
Vaibhav Sooryavanshi | India A Team | Tri Series

Vaibhav Sooryavanshi | India A Team | Tri Series

Sakal

Updated on

Tri Series in Sri Lanka: आयपीएल २०२६ संपल्यानंतर आता भारतीय संघाने जोमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात केली आहे. भारताचा राष्ट्रीय संघ अफगाणिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना खेळत असतानाच भारताचा अ संघ (India A Team) श्रीलंका दौऱ्यावर आहे.

श्रीलंकेमध्ये भारतीय अ संघाला तिरंगी वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत यजमान श्रीलंकेचा अ संघ आणि अफगाणिस्तान अ संघ देखील सहभागी आहेत.

Vaibhav Sooryavanshi | India A Team | Tri Series
IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com