CJP Pune Protest: जंतरमंतर नंतर कॉकरोच जनता पक्ष पुण्यात आंदोलन करणार! कधी आणि कुठे? पार्टीने तारीख आणि ठिकाण सांगितलं

CJP Pune Protest: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ११ जून रोजी पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे.
CJP Pune Protest

CJP Pune Protest

ESakal

Updated on

कॉकरोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या गुरूवारी (ता. ११) ‘शांतिपूर्ण आंदोलना’चा इशारा देण्यात आला आहे. ‘सीजेपी’ने ‘एक्स’वरील अधिकृत हॅंडलवरून या आंदोलनाची घोषणा केली असून कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या शिक्षणाची राजधानी असणाऱ्या पुण्यात हे आंदोलन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com