मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या भेटीने नवी मुंबईतील विकास कामांना गती

CD

मुख्यमंत्र्यांच्या भेटीने नवी मुंबईतील विकासकामांना गती ः मंदा म्हात्रे
झोपडपट्टी पुनर्वसन, ‘उमेद मॉल’ व स्पेशालिटी रुग्णालयावर सकारात्मक चर्चा
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विकासकामांबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. सोमवारी (ता. १३) पार पडलेल्या या बैठकीत नवी मुंबईच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, गृहनिर्माण आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित अनेक विषयांवर सखोल विचारविनिमय झाला.
नवी मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गोरगरिबांना सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशी घरे उपलब्ध होणार असून, नवी मुंबईच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे.
महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘उमेद मॉल’ हा अभिनव उपक्रम उभारण्याचा निर्णयही चर्चेत घेण्यात आला. या मॉलसाठी सुमारे १००० चौ.मी. जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून, यामुळे महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगारनिर्मितीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने बेलापूर येथे प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्पालाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पामुळे नवी मुंबईसह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, आरोग्य क्षेत्रात मोठी उंची गाठण्यास मदत होईल.
याशिवाय शहरातील इतर प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांवरही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावरही भर देण्यात आला.
दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे या नवी मुंबईच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, या बैठकीतून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. एकंदरीत, या बैठकीमुळे नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा आणि वेग मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT