मुंबई

नेरूळ पूर्व-पश्चिम उड्डाणपूल रखडला

CD

नेरूळ पूर्व-पश्चिम उड्डाणपूल रखडला
२० वर्षांपासून प्रकल्प प्रतीक्षेत; भाजप नगरसेवकाची अर्थसंकल्पी चर्चेत निधीची मागणी
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नेरूळ पश्चिम सेक्टर २८ ते नेरूळ पूर्व आयुक्त निवासाला जोडणारा महत्त्वाचा उड्डाणपूल गेल्या २० वर्षांपासून रखडलेला असून, याबाबत पुन्हा एकदा राजकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पी चर्चेत भाजपच्या नगरसेवकांनी या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्याची जोरदार मागणी केली.
हा उड्डाणपूल रेल्वेच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी रखडल्याचे तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामस्वामी यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर या प्रकल्पाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, विद्यमान आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः समर्थन दर्शवले असले तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा उड्डाणपूल केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. २०१९ पर्यंत महापालिकेच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा समावेश होत होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय राजवटीत या योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. २०२० साली तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव अर्थसंकल्पातून वगळण्यात आला होता.
भाजप नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करीत महापौर आणि सभागृह नेत्यांना पत्र देणार असल्याचे सांगितले.
चौकट
नागरिकांची वाढती गरज
नेरूळ परिसरातील वाढते नागरीकरण आणि पूर्व-पश्चिम दळणवळणाचा अभाव लक्षात घेता, या उड्डाणपुलाची गरज तीव्रतेने जाणवत आहे. सध्या एल अँड टी आणि राजीव गांधी उड्डाणपुलांदरम्यान सुमारे तीन ते पाच किमी अंतर असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो. यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असल्याची तक्रार आहे.
चौकट
पालिकेची उदासीनता कारणीभूत?
माजी आयुक्त डॉ. रामस्वामी यांच्या काळात रेल्वे मंत्रालयाशी सकारात्मक संवाद सुरू होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर या प्रकल्पाबाबत पालिकेची उदासीनता वाढल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या आयुक्तांनीही या प्रकल्पाला प्राधान्य दिले नसल्याची टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT