मुंबई

डॉ. संग्राम पाटील इंग्लंडला जाणार

CD

डॉ. संग्राम पाटील इंग्लंडला जाणार

अहवालासाठी तीन आठवड्यांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप असलेले इंग्लंडस्थित यूट्युबर आणि डॉक्टर संग्राम पाटील यांना इंग्लंडला परत जाण्यास मान्यता मिळाली आहे. इंग्लंडला गेल्यानंतरही महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करू, अशी हमी पाटील यांनी बुधवारी (ता. १५) उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, परदेशी यंत्रणांचा पाटील यांच्याबाबतचा अहवाल तीन आठवड्यांत न आल्यास पाटील यांना इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन सरकारने न्यायालयाला दिले.

पंतप्रधानांविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. पाटील भारतात आल्यानंतर त्यांना इंग्लंडला जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध बजावलेले लूकआऊट परिपत्रक आणि दोन गटांत शत्रुत्व वाढवल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेवर न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.

पाटील यांच्याविरुद्धचा तपास प्रगतिपथावर असून पूर्णत्वास जाण्यासाठी तीन महिने लागतील. त्यांना इंग्लंडला जाण्यास परवानगी दिल्यास ते पुन्हा भारतात परततील का, याबाबत शंका आहे. त्यांच्याबाबत काही परदेशी यंत्रणांकडून अहवाल मागवला आहे. तो येण्यासही चार आठवडे लागणार आहेत. परिणामी सध्या तरी पाटील यांना इंग्लंडला जाण्याची परवानगी देता येणार नाही, अशी माहिती महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सुरुवातीला दिली.
-------
न्यायालय काय म्हणाले?
पाटील यांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवली असून, भारतात असलेले आईवडील त्याबाबत न्यायालयात हमीपत्र देण्यास तयार आहेत. भारतात असल्यामुळे त्यांची इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमधील नोकरी धोक्यात आल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यामुळे पाटील यांना आणखी भारतात रोखणे योग्य ठरणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT