४० गावांत संतापाची लाट
वाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांची वणवण
वाडा, ता. १६ (बातमीदार) ः तालुक्यातील ४० गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यामुळे संतापाची भावना असून २० तारखेपर्यंत मुबलक पाणी मिळाले नाही तर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा ‘श्रमजीवी’ने इशारा दिला आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. अनेक गाव-पाड्यांपर्यंत टँकर पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. विशेषतः महिला, मुलांना पाण्यासाठी दररोज वणवण भटकावे लागत असून आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे; पण प्रशासनाकडून अपेक्षित गतीने उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
------------------------------
टँकरद्वारे अनियमित पाणीपुरवठा
श्रमजीवी संघटनेने गंभीर समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. अनेक वेळा लेखी निवेदने देऊन तसेच बैठका घेऊन पाणीटंचाईचा प्रश्न मांडला होता. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी अपुरा, अनियमित आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त पाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू करणे, टँकरची व्यवस्था करणे, प्रलंबित कूपनलिकांची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
-------------------------------
श्रमजीवी आक्रमक
प्रशासनाने मागण्यांची पूर्तता केली नाही तर सोमवारी (ता. २०) वाडा पंचायत समितीवर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा श्रमजीवीने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.