नवी मुंबई होणार ‘सुगंधी शहर’
अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जुईनगर, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई शहराला ‘सुगंधी शहर’ बनवण्याच्या दिशेने गरुवारी (ता. १६) महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने सुगंधी अंगण अभियान-सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर या उपक्रमाचे उद्घाटन वाशी गाव येथे करण्यात आले.
वाशी गावातील पारंपरिक गावदेवी जत्रोत्सव पालखी सोहळ्याचे औचित्य साधून या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक उपास्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना सुगंधी फुलांच्या झाडांचे वाटप करून अभियानाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रत्येक घर, अंगण, सोसायटी परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे सुगंधी व हिरवाईने नटावीत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखणे, वायुप्रदूषण कमी करणे आणि नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढवणे शक्य होणार आहे. सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. आयोजक नगरसेवक निशांत भगत आणि नगरसेविका प्रिती भगत यांनी नवी मुंबईला अधिक सुंदर, स्वच्छ, हरित आणि सुगंधी बनवण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे शहर विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.