मुंबई

सकाळच्या वृत्ताची दखल; नाला प्रदूषण प्रकरणी एमपीसीबीची रात्रीच धडक पाहणी !

CD

सकाळच्या वृत्ताची दखल; नाला प्रदूषणप्रकरणी एमपीसीबीची धडक कारवाई

अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : अंबरनाथ पूर्व परिसरातील नाल्यांमधून वाहणाऱ्या दूषित पाण्यामुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या समस्येची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गुरुवारी (ता. १६) रात्री तातडीने घटनास्थळी धडक पाहणी केली. बुधवारी (ता.१५) ‘दै. सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासन तत्काळ सक्रिय झाले.

शहराच्या पूर्व भागातील समर्थ गृह सोसायटी, डिफेन्स कॉलनी, मोहन पुरम आणि स्वामी देवप्रकाश संकुल या परिसरांमधील नाल्यांमध्ये रासायनिक अथवा दूषित पाणी मिसळत असल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनास त्रास होत असून, साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक कुणाल भोईर यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रदूषणाचा उगम शोधण्याची मागणी केली होती. तसेच केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता दीर्घकालीन तोडगा काढण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. प्रभावी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता.
भोईर यांनी कल्याण येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य अधिकारी जयंत हजारे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एमपीसीबीच्या पथकाने कानसई व साई विभागातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान नगरसेवक कुणाल भोईर, आशिष जेऊरकर, रावेरकर, शिरीष कुलकर्णी, सत्यकी गुहा, प्रशांत भोईर व श्रीप्रसाद भोसले यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- -----------

दोषींवर कारवाई करणार
या पथकात प्रादेशिक उपक्षेत्रीय अधिकारी प्रवीण पाटील व क्षेत्र अधिकारी सुधीर भताने यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी मोहन पुरम, डिफेन्स कॉलनी व समर्थ गृह सोसायटी परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी दुर्गंधी व दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांची माहिती अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रवीण पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT