मुंबई

विमा पॉलिसी बंद करण्याच्या बहाण्याने महिलेकडुन उकळले ६१.५० लाख रुपये

CD

विमा पॉलिसी बंद करण्याच्या बहाण्याने गंडा
महिलेची ६१.५० लाख रुपये फसवणूक
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : विमा पॉलिसी बंद करून तिचा परतावा आणि बोनस मिळवून देण्याच्या बहाण्याने वाशीतील एका ४३ वर्षीय महिलेची सुमारे ६१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एनपीसीआय अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी या महिलेला जाळ्यात ओढले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
सायबर टोळीतील एका सदस्याने एनपीसीआय कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून जुलै २०२५ मध्ये महिलेशी संपर्क साधला होता. त्यानंतर या गुन्हेगाराने महिलेला त्यांच्या नावे असलेल्या जुन्या भारती ॲक्सा पॉलिसीचा क्रमांक सांगून विश्वास संपादन केला व पॉलिसी बंद केल्यानंतर भरलेली रक्कम आणि बोनस परत मिळेल, असे प्रलोभन दाखवले. यासाठी भामट्यांनी एजंट कोड काढणे, बीटीसी कोड काढणे आणि कॅश कन्व्हर्ट करणे अशी वेगवेगळी कारणे सांगत पैशांची मागणी केली. तसेच या महिलेचा विश्वास बसावा यासाठी सायबर गुन्हेगारांनी विमा लोकपाल आणि एनपीसीआयचे बनावट लोगो असलेले फॉर्म्स त्यांना ई-मेलवर पाठवले. मात्र, दीर्घकाळ उललूनही त्यांना कोणतीही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सायबर पोलिसांचे आवाहन
ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नये. विमा पॉलिसी किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत अधिकृत कार्यालयात जाऊनच खात्री करावी. फसवणूक झाल्यास त्वरित नजीकच्या सायबर पोलिस ठाण्याशी किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs KKR Live: अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच फसले; पॉवर प्लेमध्ये KKR चा फुसsssका बार.. IPL 2026 मध्ये नकोसा विक्रम नावावर

Karnataka Political Crime : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आमदाराला जन्मठेप, न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

खरातसारखी प्रकरण थांबणार नाहीत! भारत गणेशपुरे असं का म्हणाले? म्हणाले, 'लोकांना पैशांची इतकी हाव...'

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

SCROLL FOR NEXT