ड्रग्ज पार्टीचे धागेदोरे उल्हासनगरपर्यंत
मुंबई पोलिसांचे सर्च ऑपरेशन; स्थानिक पोलिस अनिभिज्ञ
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) ः गोरेगावमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचे धागेदोरे थेट उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांनी शहरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये स्थानिक पोलिस यंत्रणा अनभिज्ञ असल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.
गोरेगाव येथे आयोजित टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबई-कल्याणमार्गे थेट उल्हासनगरपर्यंत पोहोचल्याचे उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील विनीत गेरेलानीला (वय २२) अटक केली असून, उल्हासनगर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. तसेच फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
अनेक ठिकाणी छापेमारी
तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पुरवठ्याची साखळी उल्हासनगर, कल्याण आणि मुंबई या भागांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे. विशेषतः उल्हासनगरमधील काही तरुण या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उल्हासनगरातील विनीत गेरेलानीच्या अटकेनंतर फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली. त्याच्या मोबाईल लोकेशन आणि संपर्क जाळ्याचा तपास वेगाने सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.