समुद्रकिनाऱ्यांवर १०६ जीवरक्षक तैनात
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गिरगाव, दादर, जुहू, अक्सा, गोराई, मढ व वांद्रे बॅण्ड स्टँड या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १०६ जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, वॉकी टॉकी, स्पीड बोटसह अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह जीवरक्षक सज्ज असणार आहेत.
पावसाळ्यात समुद्रकिनारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. समुद्राला भरती आल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटक खोल पाण्यात जाऊ नयेत, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात येते. अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता अधिक असते.
निविदा मागवल्या
या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून जीवरक्षक तैनात करण्यात येतात. जीवरक्षक पुरवणाऱ्या संस्थेचे कंत्राट संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नव्याने निविदा मागवण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी अनिल परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.