मुंबई

‘सप्तश्रुंगी’च्या विश्वस्त निवडीबाबत नवा पेच

CD

‘सप्तशृंगी’च्या विश्वस्त
निवडीबाबत नवा पेच
मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यालयातून स्थगितीचा मेल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : नाशिकमधील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर न्यासाच्या विश्वस्त मंडळातील विश्वस्तांच्या निवडीबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. विश्वस्त मंडळाच्या पाच जाणांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यालयातून मेलद्वारे स्थगिती देण्यात आली आहे. त्याला निवड झालेल्या सदस्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी न्यायालयाने शुक्रवारी (ता. १७) उच्च न्यायालयाचे महानिबंधक आणि राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

न्यासाच्या नियमावलीप्रमाणे दोन पदसिद्ध विश्वस्त वगळता उर्वरित पाच विश्वस्तांची निवड जिल्हा न्यायाधीशांकडून होते. त्यानुसार १२ मार्चला नाशिक जिल्हा प्रधान न्यायाधीशांनी ॲड. राहुल खुताडे, विष्णू वारुंगसे, डॉ. राजेंद्र वराडे, दिलीपकुमार देशमुख व डॉ. कांचन देसले यांची निवड केली. त्यांच्या निवडीला दुसऱ्या दिवशी मुख्य न्यायमूर्तींच्या मुंबई कार्यालयातून मेलद्वारे स्थगिती देण्यात आली. त्यासोबतच नाशिक जिल्हा प्रधान न्यायाधीशांची बुलडाण्याला बदली करण्यात आली. मेलद्वारे दिलेल्या स्थगितीला पाचही विश्वस्तांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर शुक्रवारी प्रथम प्रकरण मुख्य न्या. श्री चंद्रशेखर यांच्यासमोर आले असता त्यांनी ते न्या. घुगे यांच्याकडे वर्ग केले. त्या वेळी मेलद्वारे स्थगितीची बाब आणि त्या मेलची प्रतही न्यायालयात सादर करण्यात आली.

दुसरीकडे, नाशिक जिल्हा प्रधान न्यायाधीशांनी राबवलेली निवडप्रक्रिया अपारदर्शक, बेकायदा व मनमानी पद्धतीने असल्याचा आरोप करून त्यांनी केलेली पाच विश्वस्तांची निवड रद्द करण्याची मागणी अमित जाधव यांनी ॲड. कविता विजापुरे आणि ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत केली आहे.
----
मुख्य न्यायमूर्ती प्रतिवादी कसे?
मुख्य न्यायमूर्तींना प्रतिवादी केल्यावरून न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तसेच याचिकाकर्त्यांना त्यांचे तातडीने नाव प्रतिवादी म्हणून काढून टाकण्याचे तसेच उच्च न्यायालयाच्या निबंधकांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT