मुंबई

मालाडच्या मालवणीत अपघाताचा धोका वाढला

CD

मालाडच्या मालवणीत अपघाताचा धोका वाढला
गेट क्र. ८ परिसरात गतिरोधक, दुभाजक बसवण्याची रहिवाशांची मागणी
ंमालाड, ता. १९ (बातमीदार) : मालवणी गेट क्र. ८, म्हाडा वसाहतीतील रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. गेट क्र. ८ येथील अंजनी इमारतीसमोरील तसेच काळा विद्यालयासमोरील रस्त्यांचे नुकतेच काँक्रीटीकरण झाल्याने ते खड्डेमुक्त झाले आहेत. मात्र, यानंतर वाहनचालकांकडून वेगमर्यादा न पाळता बेदरकारपणे वाहन चालवले जात असल्याचे दिसून येत आहे.
या परिसरातून शाळकरी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्याच्या चारही बाजूंनी वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. अनेक वेळा दुचाकीस्वारांनी पादचाऱ्यांना धडक दिल्याच्या घटना घडल्या असून, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, अपघाताचा धोका कायम आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे तातडीने दुभाजक आणि गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित राहून संभाव्य अपघात टाळता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यापासून वाहने प्रचंड वेगाने धावत आहेत. दुचाकीस्वारही बेदरकारपणे वाहन चालवतात. त्यामुळे येथे सतत अपघाताची भीती वाटते.
- अफझल अन्सारी, रहिवासी

या रस्त्यावर दोन शाळा असल्यामुळे हजारो विद्यार्थी आणि शेकडो पालकांची वर्दळ असते. चारही बाजूंनी वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे कधीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अपघात होण्यापूर्वीच येथे दुभाजक आणि गतिरोधक बसवावेत.
- सोमा डे, दुचाकीचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Dapoli Mandangad Highway : दापोली-मंडणगड महामार्गाची दुरवस्था! विसापूर फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण; वाहनचालकांना करावी लागतेय मोठी कसरत, पर्यटनालाही फटका

Latest Marathi News Live Update : बार्शी - सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

SCROLL FOR NEXT