मुंबई

घोडबंदर मार्गावरील विद्युत अडथळे दूर करण्याकरिता येणार पावसाचे विघ्न

CD

घोडबंदरवरील रुंदीकरणाला विलंब
मार्गावरील विद्युत अडथळ्यांमुळे कोंडी कायम

ठाणे शहर, ता. १९ (बातमीदार) : घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आले असले तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब आणि जनित्र मुख्य अडथळा ठरू लागले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेले हे अडथळे दूर होण्याकरिता आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामाकरिता ठाणे महापालिकेकडून निविदा मंजूर झाली असली तरी कामाचा व्याप पाहता हे काम पूर्ण करण्याकरिता पावसाळा जाण्याची वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने रुंदीकरणाच्या मार्गात येणारे किती अडथळे आहेत, याचा लेखाजोखा महापालिकेकडे पाठवण्यात आला असून, त्यासाठी लागणारा अंदाजे खर्चदेखील सुचवण्यात आला आहे. महापालिकेनेदेखील खर्चाचे टेंडर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, लवकरच दूर करण्याचे हाती घेतले जाणार आहे. मात्र, कामाची व्याप्ती पाहता हे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल, अशी शक्यता असल्याने महामार्गाची कोंडी फुटण्यासाठी पावसाळा जाण्याची वाट पहावी लागणार आहे. घोडबंदर मार्ग वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक नावासेवा या जागतिक बंदराला जोडण्यात आली असून, घोडबंदर मार्गे गुजरात राज्यात आणि पालघर सह बोईसर, वसई आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होते. रोज सुमारे एक लाखांहून अधिक वाहने या मार्गाने ये जा करतात. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण होणे अत्यंत आवश्यक बाब समजून शासनाने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहेत.

-----------------
अनेक गोष्टींचा अडथळा
दोन्ही बाजूकडील रस्त्याचे सहा पदरी मार्गात रूपांतर केले जात आहे. याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा रस्तेदेखील मुख्य मार्गात विलीन करण्यात येत आहेत. सेवा रस्त्याचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित कामदेखील गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरच येथील वाहतूक कोंडी फुटेल, अशी चिन्हे दिसत असली तरी या मार्गावर असलेल्या विद्युत तारा, लोखंडी खांब, जनित्र आदी अडथळे ठरत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागात आलेल्या विद्युत अडथळ्यांची पाहणी करून ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या माध्यमातून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
--------------------
ठाणे महापालिकेच्या निधीमधून कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत खांबांचे काम झाले होते. मात्र, आता सेवा रस्ते चुकीच्या पद्धतीने मुख्य रस्त्याला जोडले जात असल्याने पुन्हा विद्युत कामासाठी कोट्यवधी खर्चाचा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नियोजनात मोठा अभाव असल्याने कोट्यवधींचा नाहक चुराडा होत आहे.
- नरेश मणेरा, मा. उपमहापौर, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT