भरधाव ट्रकची विद्युत रोहित्राला धडक
खालापूर (बातमीदार) ः सावरोली-खारपाडा राज्यमार्गावर माडप गावच्या हद्दीत शनिवारी (ता. १८) एका भरधाव ट्रकने महावितरणाच्या विद्युत रोहित्राला धडक दिली. या अपघातात १०० केव्ही क्षमतेच्या रोहित्राचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक नीलेश केशव प्रसाद शाहू (वय २१, रा. मध्य प्रदेश) सावरोली-खारपाडा मार्गावरून जात असताना ट्रक अनियंत्रित झाला आणि माडप गावाच्या हद्दीतील स्वस्तिक कंपनीसमोरील विद्युत रोहित्राला धडकला. याप्रकरणी महावितरणाचे कर्मचारी दत्ता विरले यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार जानू शेळके करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.