मुंबई

हरित संवर्धनासाठी ‘ग्रीन टीडीआर’ योजना : एकनाथ शिंदे

CD

हरित संवर्धनासाठी ‘ग्रीन टीडीआर’ योजना : एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १९ : वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत राज्य सरकारने खारफुटी संरक्षणासाठी नवा कायदा लागू केला असून, ‘ग्रीन टीडीआर’ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे किनारपट्टी नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) खारफुटींवरील बेकायदा कामांना आळा बसून त्यांचे रक्षण होण्यास मदत होणार असल्याचेदेखील शिंदे यांनी सांगितले.

‘क्रेडाई-एमसीएचआय ठाणे’च्या वतीने आयोजित मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन १९ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या वेळी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेत त्यांनी सांगितले की, घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असून, वाहतुकीस मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ३३७ किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारले जात असून, ठाण्यातील अंतर्गत मेट्रोही मुख्य मार्गांशी जोडली जाणार आहे. ठाणे आणि मुंबईदरम्यान ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू असून, यामुळे वाहतुकीचे पर्याय वाढतील. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खाडीकिनारी मार्गिकेचे कामही सुरू असून, हा मार्ग शहराबाहेरून जाणार असल्याने शहरातील गर्दी कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील हरित पट्ट्यांमुळे शहराचे तापमान तुलनेने कमी असल्याचे नमूद करत दरवर्षी एक लाख झाडांची लागवड करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनीही वृक्षारोपणात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT