मुंबई

पालिका कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता करासह विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे मिळवण्यासाठी ठाणे पालिका मुख्यालयापासून प्रभाग समिती कार्यालयांमध्ये ठाणेकरांना माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता कमी होणार आहेत. ठाणेकरांचा त्रास कमी करण्यासाठी, तसेच अधिक पारदर्शक, सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह डिजिटल सेवा देण्यासाठी ठाणे महापालिका ब्लॉकचेन (ब्लॉक साखळी) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमामुळे महापालिकेच्या कामकाजात आमूलाग्र बदल अपेक्षित असून, ‘बोगसगिरी’ला प्रभावी चाप बसण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीमध्ये ब्लॉकचेन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. पालिकेकडून दिले जाणारे जन्म व मृत्यू दाखले ब्लॉकचेन आधारित डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे बनावट दाखल्यांचे प्रकार थांबण्यास मदत होणार असून, कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया अधिक जलद आणि अचूक होईल. याशिवाय अग्निशमन, आरोग्य आणि बांधकाम विभागाकडून दिले जाणारे परवाने तसेच ना-हरकत प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात दिली जाणार आहेत. तसेच सेवा हमी कायद्यांतर्गत मालमत्ता कराशी संबंधित कागदपत्रे, विविध प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा निश्चित वेळेत आणि सुरक्षितरीत्या नागरिकांना उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करणे, पाठपुरावा करणे किंवा वारंवार फेऱ्या मारणे याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.

४९ लाखांचा खर्च
या संपूर्ण उपक्रमासाठी सुमारे ४८ लाख ९७ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब) अंतर्गत आर्थिक दायित्व स्वीकृतीची प्रक्रिया आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने सुरू करण्यात आली आहे. लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

सायबर सुरक्षेलाही बळकटी
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा नोंदवलेली माहिती बदलता येत नाही. ही माहिती ‘ब्लॉक्स’मध्ये साठवली जाते आणि साखळीप्रमाणे एकमेकांशी जोडलेली असते. त्यामुळे कोणतीही छेडछाड करणे अत्यंत कठीण होते. क्रिप्टोग्राफिक हॅश प्रणालीमुळे डेटा अधिक सुरक्षित राहतो आणि सायबर हल्ल्यांपासून संरक्षण मिळते. तसेच माहिती एका सर्व्हरवर न ठेवता अनेक संगणकांवर साठवली जात असल्याने डेटा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह राहतो.

ब्लॉकचेन म्हणजे काय?
ब्लॉकचेन हे विकेंद्रित डिजिटल खातेवही तंत्रज्ञान आहे. यामध्ये प्रत्येक व्यवहार ‘ब्लॉक’मध्ये नोंदवला जातो आणि नेटवर्कमधील संगणकांकडून त्याची पडताळणी केली जाते. हे सर्व ब्लॉक्स साखळीप्रमाणे जोडलेले असल्याने माहिती सुरक्षित, पारदर्शक आणि अपरिवर्तनीय राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: कोलकाताने अखेर विजय मिळवला; राजस्थानला Rinku Singh चा झेल सोडणे महागात पडले, मुंबई इंडियन्सला धक्का

तोरणागडावर थरारक प्रसंग! मुंबईचा पर्यटक २०० फूट खोल दरीत पडला, अंधारात दोरखंड टाकून पर्यटकाला वर काढले, स्थानिकांच्या तत्परतेने टळला अनर्थ..

Pune Crime : हुंडाबळीचा विळखा: वाघोली-आव्हाळवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून दोन विवाहितांचा गळफास घेऊन मृत्यू

OpenAI मध्ये सर्वोच्च पद, कोट्यवधी रुपयांचं पॅकेज...तरीही का सगळं सोडून भारतात परतत आहेत श्रीनिवास नारायणन?

Team India: सूर्यकुमार यादवचा गेम होणार अन् श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कॅप्टन होणार?

SCROLL FOR NEXT