१३ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील तब्बल १२ लाख ८२ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. त्याकरिता दररोज ४,७७९ मेगावाॅट विजेचा पुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री कृषिपंप चालवण्याच्या संकटातून सुटका होत आहे.
राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६ हजार मेगावॉट क्षमतेचे विक्रेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आतापर्यंत आतापर्यंत ३,१८७ कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात आले असून, राज्यातील तब्बल १२ लाख ८२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा ४,७७९ मेगावॅट विजेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे.
या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगारनिर्मिती सुरू आहे. महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीशिवाय मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ९,१७,५८७ कृषिपंप उपलब्ध करून दिले आहेत. देशभरात बसवण्यात आलेल्या एकूण ऑफ ग्रीड सौर कृषिपंपांपैकी ६४ टक्के कृषिपंप एकट्या महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.