उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : शिक्षकांना अध्यापनाबाहेरील कामांच्या ओझ्याखाली दबवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी थेट महापौर व प्रशासनासमोर आवाज उठवला आहे. शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करण्याची मागणी करत महत्त्वपूर्ण सहविचार सभेत सकारात्मक आश्वासने देण्यात आली.
उल्हासनगर महापालिकेत महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना व असोसिएशन ऑफ स्टुडंट्स, टिचर्स, एज्युकेटर्स, पॅरेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक विषयांवर सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शिक्षकांवर लादण्यात येणारी बीएलओची कामे, जनगणनेचे आदेश, सीआरसीमार्फत मागवली जाणारी तातडीची कामे, तसेच अध्यापनाव्यतिरिक्त शाळांना करावी लागणारी अनावश्यक अशैक्षणिक कामे यावर चर्चा झाली.
शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस आणि ए-स्टेप संघटनेच्या अध्यक्षा रेखा ठाकूर, सचिव विजय माखिजा, शिक्षण क्रांती संघटनेचे देवीदास नरवाडे, ज्ञानेश्वर गोसावी, राजेंद्र गवळी, विनोद आहेर, अरुण कपाळे यांनी शिक्षकांच्या अडचणी मांडत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. यावर गटनेते अरुण आशान यांनी आवश्यक कर्मचारी भरती करून मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना अशा कामांतून कार्यमुक्त करण्याचे आश्वासन दिले. या सभेस महापौर अश्विनी निकम, उपायुक्त स्नेहा करपे, अधिकारी दीपक धनगर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.