तिसऱ्या मुंबईसाठी २१६ एकर जमीन ताब्यात
सहभागात्मक पद्धतीने भूसंपादनास सुरुवात
मुंबई, ता. १९ : तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भूसंपादनास सुरुवात केली आहे. ‘मुंबई ३.०’च्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनासाठी एमएमआरडीएने सहभागात्मक भूसंपादन धोरण आणले आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच २१६ एकर जमीन संमतीने संपादित करण्यात आली. त्याबाबतचा करार शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
मुंबई आणि नवी मुंबईवरील भार कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात सुमारे ३२३.४४ चौ. किमी क्षेत्रावर तिसरी मुंबई उभारली जात आहे. ‘मुंबई ३.०’ या नव्या महत्त्वाकांक्षी शहर संकल्पनेच्या अंमलबजावणीकडे ‘एमएमआरडीए’ने निर्णायक पाऊल टाकत जमीनमालकांच्या संमतीने जमीन संपादन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यास जमीनमालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने जागतिक दर्जाच्या एकात्मिक शहरी विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस औपचारिक प्रारंभ झाला आहे.
---
जमीनमालकांची संमतीपत्रे
दरम्यान, जमीन देण्यासाठी अनेक जमीनमालकांची संमतीपत्रे येत असून, ती २७ एप्रिल २०२६ पासून एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भूसंपादन संमतीपत्राबाबतचा अर्ज करताना आधार कार्ड, ७/१२ आणि ८अ उतारा सादर करणे आवश्यक आहे.
---
लोकांसाठी आणि लोकांच्या सहभागीसाठी ‘मुंबई ३.०’ साकारली जाणार आहे. या सहभागात्मक धोरणातून आपण केवळ जमीन संपादित करीत नाही तर विश्वास निर्माण करीत आहोत. हा करार प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारे जागतिक दर्जाचे शहर उभारण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
---
तिसरी मुंबई लोकांच्या सहभागातून उभे राहणारे शहर आहे. जमीनमालकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा सहभागात्मक भूसंपादन धोरणावरील वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे. या टप्प्यानंतर नियोजनातून अंमलबजावणीकडे ठोसपणे वाटचाल करण्यात येईल.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.