मुंबई

नवी मुंबईतील शाळेत रंगतदार ‘आर्ट मेला’

CD

नवी मुंबईतील शाळेत रंगतदार ‘आर्ट मेला’
सोशल मीडियापासून दूर, कल्पकतेला व्यासपीठ; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत त्यांच्या सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ९३ (सीबीएसई) तर्फे आयोजित ‘आर्ट मेला’ उत्साहात पार पडला. शाळेच्या परिसरात शनिवारी आयोजित या उपक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत त्यांची कल्पनाशक्ती विकसित करण्याचा हा प्रयत्न विशेष ठरला.
या आर्ट मेळ्यात विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांद्वारे आपली प्रतिभा खुलवली. कागदी पिशव्या तयार करणे, रंगीत चित्रकला, पारंपरिक वारली कला तसेच मातीपासून नक्षीदार वस्तू तयार करण्याचे आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळाले. काही विद्यार्थ्यांनी पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंपासून पर्यावरणपूरक कलाकृती साकारत ‘कला आणि पर्यावरण’ यांचा सुंदर मेळ घातला. प्रत्येक कलाकृतीतून विद्यार्थ्यांची मेहनत, कल्पकता आणि कलाप्रेम स्पष्टपणे जाणवत होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींबाबत माहिती देत पालकांशी संवाद साधला, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली. अनेकांसाठी हा पहिलाच अनुभव प्रेरणादायी ठरला. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

चौकट
सर्जनशीलतेतून सर्वांगीण विकास
‘आर्ट मेला’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे ठरतात. कला सादरीकरणातून त्यांची अभिव्यक्ती क्षमता वाढते, आत्मविश्वास दृढ होतो आणि नवीन कल्पना मांडण्याची प्रेरणा मिळते. तसेच, पर्यावरणपूरक संकल्पनांशी जोडल्यामुळे जबाबदार नागरिक घडवण्यासही मदत होते. त्यामुळे अशा उपक्रमांची शालेय शिक्षणात सातत्याने गरज अधोरेखित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT