मुंबई

झाडांची नासधूस रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे

CD

झाडांची नासधूस रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे
ऑक्सिजन पार्क आगीनंतर पालिकेचे आवाहन
तुर्भे ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबईतील बेलापूर येथील पारसिक हिल टेकडीवर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीला काही असामाजिक घटकांकडून धोका निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. जुलै २०२५ मध्ये आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या माध्यमातून येथे ३० हजारांहून अधिक भारतीय प्रजातींच्या झाडे, झुडपे आणि गवताची त्रिस्तरीय लागवड करण्यात आली होती. या उपक्रमामुळे परिसरात ‘ऑक्सिजन पार्क’ निर्माण होऊन जैवविविधतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
मात्र अलीकडच्या काळात झाडांच्या फांद्या तोडणे, फुले तोडणे तसेच लागवड क्षेत्रातील गवताला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषतः ५ मार्च २०२६ रोजी लागलेल्या आगीत अनेक झाडांचे नुकसान झाले असून, पाण्याची ड्रीप लाइनही जळून खाक झाली. या घटनेनंतर संबंधित संस्थेकडून तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, बाधित झाडांना नियमित पाणी दिले जात आहे.
उद्यान उपायुक्त स्मिता काळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, वृक्षसंवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारांना आळा घालावा. या वेळी अधीक्षक प्रकाश गिरी आणि उद्यान सहाय्यक राज बांगर यांनीही पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

Team India News: श्रेयस अय्यरच नव्हे, तर IPL 2026 मधील ५ स्टार खेळाडू भारताच्या ट्वेंटी-२० संघात करू शकतात पुनरागमन

SCROLL FOR NEXT