मुंबई

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

CD

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मेट्रो, रिंगरोड, डबल डेकर रस्ते, नवीन कनेक्टिव्हिटी मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण येथे आयोजित एमसीएचआय प्रॉपर्टी प्रदर्शनात ते बोलत होते. या वेळी कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, थारवानी इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी मोहन थारवानी आणि एमसीएचआयचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. थारवानी समूहाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.
एकनाथ शिंदे म्हणाले, तुमचे सर्व प्रश्न सोडवू; मात्र घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवा. मेट्रो-५ प्रकल्पाचे टेंडर लवकरच निघणार असून शिळफाटा रस्ता तीन पदरी करण्यात येणार आहे. तसेच रांजणोली मार्गाचेही रुंदीकरण सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक बाहेर वळवण्यासाठी रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय जेएनपीए-वडोदरा महामार्गाला कल्याणजवळ कनेक्टिव्हिटी देण्याची विनंती कल्याण-डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिकांनी केली आहे. तिचा धागा पकडत आपण संबंधितांना त्याबाबत कल्याणला अप्रोच देण्याबाबत नक्कीच सूचना करू, असे त्यांनी या वेळी आश्वस्त केले. ठाणे-पडघा ८ लेन मार्ग, डबल डेकर रस्ते अशा प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

पाणीटंचाई दूर करणार
नवीन काळू धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विकसकांनी शहरातील रस्ते, सुविधा, सार्वजनिक कामांमध्ये सहभाग घ्यावा. महापालिका आणि शासन आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देईल. तसेच कल्याण स्थानक सॅटीस प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT