मुंबई

अखेर ‘चिन्ह’ वादावर पडदा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवकांनी पक्षचिन्हाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर शिवसेना शिंदे गटाकडून आक्षेप नोंदवत दुसऱ्या महासभेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह लावून उपस्थित राहत कुरघोडी केल्याची चर्चा रंगू लागली. त्यावर तोडगा काढीत महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि पालिका आयुक्त यांच्या संकल्पनेतून ‘मी नगरसेवक’ चिन्ह (बिल्ला)चे अनावरण करीत त्याचे सभागृहात नगरसेवकांना वाटप करण्यात आले. त्यामुळे पक्षचिन्हावरून सुरू झालेल्या वादावर अखेर पडदा पडला.

ठाणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेवेळी सत्ताधारी मित्रपक्षांतील दडलेला संघर्ष उघडपणे समोर आला. पक्षचिन्हांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय कुरघोडी रंगल्या होत्या. पालिकेच्या पहिल्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपच्या नगरसेवकाकडून पक्षाचे चिन्ह लावून येण्यावर आक्षेप नोंदवला होता. या सभागृहात येताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या पक्षाचे जोडे बाहेर ठेवून यायचे असते. त्यामुळे या सभागृहात येताना कोणीही पक्षचिन्ह लावून सभागृहात येऊ नये, असा टोला भाजपचे नाव न घेता लगावला. त्यानंतरच्या महासभेत शिवसेनेला भाजपा नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. महासभेत भाजपचे नगरसेवक हे पक्षचिन्ह न लावता सहभागी झाले होते. मात्र शिवसेना नगरसेवकांना धनुष्यबाण हे पक्षाच्या चिन्हाचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी महासभेचे कामकाज सुरू असतानाच भाजपच्या नगरसेवकांना पक्षाच्या चिन्हाचे वाटप केले होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्धाची चर्चा सभागृहात रंगली होती.

भाजप आणि शिवसेनेमधील पक्षचिन्ह वादावर पडदा पडावा, या प्रश्नावरून पुन्हा महासभेत चर्चा होऊ नये, यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी युक्ती लढवित आमदारांना बिल्ला देण्यात येतो त्याप्रमाणे ठाणे पालिकेतील सदस्यांसाठी ‘मी नगरसेवक’ चिन्हाचे अनावरण केल्यामुळे या वादावर अखेर पडदा पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT