सिडको घरांच्या किमतीत कपात
लाभार्थ्यांकडून आमदार पाटील यांचे आभार
पनवेल, ता. २० : सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे घर’ योजनेतील घरांच्या वाढीव किमती सुमारे १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय झाल्यानंतर हजारो लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पनवेल येथे आयोजित ‘आभार व संवाद’ कार्यक्रमात आमदार विक्रांत पाटील व माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचे जाहीर आभार मानण्यात आले. रॉयल गार्डन लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमाला सिडको लॉटरीतील विजेते लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोकडून सुमारे ६७ हजार घरांचे बांधकाम सुरू असून, त्यापैकी २५ हजार घरांसाठी लॉटरी यापूर्वी पार पडली होती. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. काही ठिकाणी या किमती खासगी प्रकल्पांपेक्षाही अधिक असल्याची भावना व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांनी घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हेच माझे कर्तव्य आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.