मुंबई

घराघरांत ‘लाल मसाला’ तयार करण्याची धामधूम

CD

घराघरांत ‘लाल मसाला’ तयार करण्याची धामधूम
महिलांना रोजगाराची संधी; मिरची वाळवण्यापासून दळणापर्यंत कष्टप्रद प्रक्रिया

तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : उन्हाची तीव्रता वाढू लागली की घराघरांत पारंपरिक कामांना सुरुवात होते. विशेषतः महिलांकडून विविध प्रकारचे मसाले तयार करण्याची लगबग सुरू होते. दररोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा लाल मसाला हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असल्याने त्याची गावच्या मोकळ्या जागेत मोठ्या उत्साहात तयारी केली जाते.
सध्या बाजारपेठेत मसाल्यांच्या खरेदीला चांगलाच वेग आला असून मिरची, मिरची पूड आणि खडा मसाला यांना मोठी मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च ते एप्रिल महिन्यात तिखट बनवण्याची तयारी सुरू होते आणि आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा, नेरूळ, घणसोली, दिघा, कोपरखैरणे, वाशी आणि करावे, बेलापूर परिसरातील मूळ गावांमध्ये मसाला बनवण्याचा हंगाम रंगात आला आहे. या ठिकाणी अजूनही पारंपरिक पद्धती जपल्या जात असून अंगणात किंवा मोकळ्या जागेत मिरच्या वाळवताना दिसतात. काही ठिकाणी महिलांचा एकत्रित गट तयार होऊन मोठ्या प्रमाणावर मसाले बनवले जातात.
दरम्यान, या प्रक्रियेत महिलांची मेहनत खूप मोठी असते. मिरची निवडणे, वाळवणे, भाजणे, दळणे आणि योग्य प्रमाणात मिश्रण करणे, या सर्व टप्प्यांमध्ये बारकाईने लक्ष द्यावे लागते. त्यामुळे हा केवळ घरगुती उपक्रम न राहता अनेक महिलांसाठी रोजगाराचे साधनही बनला आहे. काही महिला घरगुती मसाले विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत, तर काही जणी ऑर्डरनुसार मसाले तयार करून देतात.

परंपरेची उत्‍साहाने जपवणूक
पावसाळ्यापूर्वी तयार केलेल्या घरगुती मसाल्यामुळे स्वयंपाकाला खास चव येते, याची जाणीव सर्वांना असल्याने शहरात राहणारे अनेक जणही आपल्या गावाकडील नातेवाइकांकडून मसाले तयार करून घेत आहेत. त्‍यामुळे महिनाभर आधीपासूनच गृहिणींची मिरची आणि मसाल्याच्या साहित्याच्या खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने मसाले तयार करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात असल्याचे देवयानी पाटील यांनी सांगितले.

अशी असते प्रक्रिया
या वेळी, सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला तसेच आगरी-कोळी मसाला असे विविध प्रकार घराघरांत बनवले जातात. प्रत्येक कुटुंबाची मसाला तयार करण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यामागील चव आणि परंपरा एकसारखीच जपली जाते. ऐन हंगामात मिरचीचे दर वाढतात, त्यामुळे महिला आधीच मिरची खरेदी करून ती तीन ते चार वेळा उन्हात वाळवून ठेवतात. त्यानंतर त्यात गरम मसाला, धणे, बडीशेप यांसारख्या घटकांचे मिश्रण करून मसाला तयार केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT