मुंबई

नेरूळमध्ये पदचारी पुलाऐवजी सबवेची मागणी

CD

नेरूळमध्ये पादचारी पुलाऐवजी सबवेची मागणी

नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर-१० येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदचारी पुलाच्या ठिकाणी भुयारी मार्ग (सबवे) उभारण्याची मागणी नगरसेवक प्रदीप उत्तम गवस यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
सध्या नेरूळ पूर्व व पश्चिम भागाला जोडण्यासाठी या पादचारी पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सेक्टर ६, ८, १०, १२, १४, १६, १८ आणि २४ येथील नागरिक, विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या पुलावर अवलंबून आहेत. परिसरात शाळांची संख्या अधिक असल्याने या पुलाचे महत्त्व वाढले आहे; मात्र हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याने रिक्षा व दुचाकी वाहने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवासासाठी नागरिकांना लांबचा वळसा घ्यावा लागतो आणि अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो. तसेच पुलावरील चढ-उतारामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर शिरवणे परिसराच्या धर्तीवर येथे भुयारी मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित सबवेच्या माध्यमातून दुचाकी, रिक्षा व लहान वाहने सहजपणे ये-जा करू शकतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पाचे लवकरात लवकर सर्वेक्षण करून तांत्रिक मंजुरी घेऊन काम सुरू करावे, अशी मागणीही गवस यांनी महापालिकेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT