मुंबई

जैव वैद्यकीय प्रकल्पावरून अंबरनाथमध्ये संताप

CD

अंबरनाथ, ता. २१ (वार्ताहर) : आनंदनगर एमआयडीसी परिसरात प्रस्तावित जैववैद्यकीय व घातक कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. प्रदूषणाचा धोका, तसेच चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर संभाव्य परिणामामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तातडीने प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला.

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसी जांभिवली फेज चार परिसरात प्रस्तावित जैववैद्यकीय व घातक कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकल्पामुळे अंबरनाथच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी आक्रमक भूमिका घेत, अंबरनाथ नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर तातडीने चर्चा करून प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून ठोस निर्णय अपेक्षित आहे, असे भोईर यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय मंजुरी, सार्वजनिक सुनावणी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्यांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नगर परिषदेमधील विविध पक्षांचे नगरसेवक या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतात की केवळ औपचारिकता पार पाडतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT