चार दशकांनंतर पुन्हा बहरली मैत्रीची बाग
ठाणे, ता. २१ : मुंबईतील अहिल्या विद्यालय (भांडुप) येथे तब्बल ३९-४० वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आले आणि शाळेच्या परिसरात जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी अनेक वर्षांनी एकमेकांना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.
या विशेष प्रसंगी शाळेतील शिक्षक प्रमोद मोरजक तसेच त्यांच्या सहकारी शिक्षकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत जुन्या आठवणी जागा केल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण अधिक आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे झाले होते. सुमारे चार ते पाच तास सर्व मित्र-मैत्रिणींनी शाळेत वेळ घालवत बालपणीच्या आठवणी, खोडकर किस्से, शाळेतील गमतीजमती तसेच आयुष्यातील सुख-दुःखाच्या अनुभवांची देवाणघेवाण केली. या भेटीत हशा, आनंद आणि काही क्षण भावनिकही झाले. यामुळे वातावरण अधिक रंगतदार बनले.
या कार्यक्रमाची संकल्पना राबविण्यात प्रवीण पालकर, महेश मोरे यांचा मोलाचा वाटा होता. तसेच सूत्रसंचालन उर्जिता शेट्ये आणि संतोष सालेकर यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. ही भेट केवळ आठवणींना उजाळा देणारी नव्हती, तर हरवलेली नाती पुन्हा दृढ करणारी ठरली. भविष्यातही अशा प्रकारे सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.