मुंबई

कर्जतमध्ये गॅससाठी रांगा

CD

कर्जतमध्ये गॅससाठी रांगा
प्रशासनाचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
कर्जत, ता. २१ (बातमीदार) : शहरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
आमराई रोडवरील भारत गॅस सर्व्हिस एजन्सी कार्यालयाबाहेर सकाळपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागतात. दुपारच्या कडक उन्हातही सावली, पिण्याचे पाणी किंवा बसण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गॅस वितरणात मोठा विलंब होत असून, सध्या सुमारे ४५ दिवसांनी सिलिंडर मिळत असल्याची माहिती आहे. ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणी येत असल्याने अनेक नागरिक प्रत्यक्ष एजन्सीसमोर येत आहेत. त्यामुळे गाडी येण्यापूर्वीच मोठी गर्दी होत आहे.
विशेषतः महिलांना आणि लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. घरात एकच सिलिंडर असलेल्या कुटुंबांपुढे स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. घरपोच सेवेचा दावा केला जात असला तरी ती सेवा प्रत्यक्षात अपुरी ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
चौकट
वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गॅसची कमतरता नसल्याचा दावा केला जात असतानाही नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांसाठी तात्पुरती सावली, पिण्याच्या पाण्याची सोय आणि वेळेवर गॅसपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT