मुंबई

डीपीएस फ्लेमिंगो तलावात विषारी नाल्याचे पाणी ; एसटीपी गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

CD

डीपीएस फ्लेमिंगो तलावात नाल्याचे दुषित पाणी
ताज्या प्रयोगशाळा अहवालातून उघड, प्रदूषणाचा वाढता भार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावालगतच्या नाल्यातून प्रदूषित पाणी प्रवाहित होत असल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञांना मिळाली आहे. अपुरी प्रक्रिया केलेले महापालिकेचे सांडपाणी ओहोटीच्या वेळी डीपीएस शाळेच्या शेजारच्या तलावातील पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे तलावातील जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने महापालिकेने तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पर्यावरणवादी संस्थांनी प्रदूषित पाण्याच्या केलेल्या तपासणीत पीएच ९.१२ आढळला असून, ६.५ ते ८.५ या मर्यादेक्षमतेपेक्षा ते प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ पाणी अत्यंत क्षारयुक्त असून जलचर, सूक्ष्म जीव आणि नाजूक जल परिसंस्थेला त्याचा फटका बसू शकतो. डीपीएस फ्लेमिंगो तलाव हा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेल्या विस्तृत जलक्षेत्र साखळीचा भाग असून, त्याच्या आरोग्याबाबत आधीपासून चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी तलावातील पाण्याच्या तपासण्यांत सेंद्रिय प्रदूषण, शेवाळ वाढ आणि सांडपाणी मिसळल्याची चिन्हे दिसून आली होती. प्रत्यक्ष पाहणीत फेस, तेलकट थर आणि दाट शेवाळही आढळले होते. सेव्ह मँग्रोव्हज अँड फ्लेमिंगोज फोरमच्या रेखा सांखळा यांनी एसटीपी उत्सर्जनाचे तत्काळ निरीक्षण, भरती-ओहोटी प्रवाह अभ्यास, बेकायदा सांडपाणी जोडण्या बंद करणे आणि पुढील स्थलांतरित पक्षी हंगामापूर्वी तलाव पुनरुज्जीवनाची मागणी केली. प्रयोगशाळेने हा नमुना अंतर्गत जलगुणवत्ता निकषांशी सुसंगत नसल्याचे नमूद केले. ही तपासणी करवून घेतलेल्या नॅटकनेक्ट फाउंडेशनने म्हटले, की तलावाकडे आणि पुढे ठाणे खाडीकडे जाणाऱ्या खुल्या नाल्यात सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर कितपत परिणामकारक प्रक्रिया केली जाते, यावर या निष्कर्षांमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. उच्च पीएच म्हणजे पाणी जास्त क्षारीय असल्याचे द्योतक आहे. त्यामुळे जलचर जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो. वाढलेला टीडीएस म्हणजे अतिरिक्त क्षार व विरघळलेले प्रदूषक, तर वाढलेला बीओडी म्हणजे सेंद्रिय प्रदूषणाचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होऊ शकतो. हा साधा पावसाच्या पाण्याचा नाला नाही. ओहोटीच्या वेळी हे पाणी फ्लेमिंगो जलक्षेत्रात पोहोचते. अशा गुणवत्तेचे पाणी प्रणालीत जात असेल तर प्रक्रिया मानके व देखरेखीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

प्रयोगशाळेने घेतलेले नमुने
एसएसएएस प्रयोगशाळेने तपासलेल्या नमुन्यात टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स (टीडीएस) ७,९५० मिग्रॅ/लिटर नोंदवले गेले, जे निर्धारित २,१०० मिग्रॅ/लिटर मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ३६.४ मिग्रॅ/लिटर आढळले, जे परवानगी असलेल्या ३० मिग्रॅ/लिटर मर्यादेपेक्षा जास्त आहे. केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) ११४.८ मिग्रॅ/लिटर नोंदवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT