मुंबई

जूईनगरचे धारण तलावाच्या कामला राजकीय फटका

CD

जुईनगरच्या धारण तलावाच्या कामाला राजकीय फटका
दबावामुळे महापालिकेचे चालढकलपणा, पुन्हा पुरस्थितीची भीती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : जूईनगर येथील धारण तलावावरील अतिक्रमणमुक्त झाल्यानंतर आता या ठिकाणचे खोदकाम राजकीय कचाट्यात अडकले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने या ठिकाणी तलाव निर्मितीकरीता निविदा प्रक्रिया राबवली आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला कार्यदेश देऊन दोन महिने उलटून गेले आहेत. परंतू, स्थानिक गुंडांच्या राजकीय दबावामुळे महापालिकेकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी काम सुरु न झाल्यास जूईनगर व सानपाड्यातील रहिवाशांची घरे पाण्याखाली जाण्याची भीती नागरीकांकडून वर्तवण्यात येत आहेत.
जुईनगर सेक्टर २१ येथे सिडकोने महापालिकेला दिलेल्या धारण तलावात मातीचा भराव टाकून चक्क क्रिकेटचे मैदान, विविध बेकायदा महाकाय आकाराची गोदामे, बेकायदा मोबाईल टॉवर आदी चुकीच्या बाबी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होत्या. गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नाले, गटारांद्वारे जलधारण तलावात पाणी गेले नाही. परिणामी, पावसाचे आणि भरतीचे सर्व पाणी जुईनगर आणि सानपाडा परीसरात गेले. या भागातील रस्ते जलमय झाले. काही बैठ्या घरांमध्ये पाणी जाऊन अतोनात नुकसान झाले. याचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’मध्ये आल्यानंतर महापालिकेने दुसऱ्या दिवशी त्याजागेवर अनधिकृत बांधकामे आणि गोदामे तोडून टाकले. मात्र, मातीचा भराव काढला नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी पुन्हा जुईनगर व सानपाड्यातील रहिवाशांवर पुरजन्य परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत मल्हार देशमुख यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तसेच न्यायालयाचे आदेश असतानाही महापालिकेने मातीचा भराव न काढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकाराची दखल घेत न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत मातीचा भराव जलधारण तलावातून काढण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.

होल्डिंग पॉंडचे महत्व
शहरात पावसाचे आणि भरतीचे पाणी घुसून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, याकरीता सिडकोने नवी मुंबईतील ८ नोडमध्ये जलधारण तलाव तयार केले आहेत. या तलावांच्या अस्वच्छतेमुळे गेले अनेक वर्षांपासून गाळ साठलेला आहे. त्या गाळावर आता कांदळवने तयार झाली आहेत. त्यामुळे महापालिकेला स्वच्छता करण्यात अडचणी येत आहेत. त्याचा गैरफायदा घेत सिडकोने महापालिकेला दिलेला जुईनगर सेक्टर २१ येथील जलधारण तलाव भूमाफियांच्या तावडीत सापडला होता.

कामाला सुरुवात कधी होणार
जुईनगर आणि सानपाडा या नोडमध्ये पावसाचे पाणी साठून जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याला जुईनगरमधील जलधारण तलावात झालेले अनधिकृत बांधकाम जबाबदार असल्याचा दावा याचिकाकर्ते मल्हार देशमुख यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने महापालिकेला सर्व अनधिकृत बाबी हटवण्याचे आदेश दिले होते. यात मातीचा भराव सुद्धा काढणे अभिप्रेत होते. मात्र, तरी सुद्धा पावसाळा तोंडावर आले असतानाही महापालिकेने माती न काढल्याने पुन्हा पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट चिन्हे आहेत.

नवी मुंबई महापालिका फक्त वेळकाढूपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतू त्याचा काही फायदा होणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेला मातीचा भराव काढून तलाव निर्मिती करावी लागणार आहे. परंतू पावसाळ्याआधी न काढल्यास त्याचा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. तसेच न्यायालयाचा अवमान होणार नाही. याची काळजी घेण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे.
- ॲड. मल्हार देशमुख, याचिकाकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT