अवकाळी पावसामुळे आंबा काजू उत्पादनाला फटका
कृषी विभागाकडून पंचनामे सुरू
पेण, ता. २१ (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून बदलणाऱ्या हवामानाचा पेण तालुक्याला मोठा तडाखा बसला. मंगळवारी (ता. २१) सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेला आंबा आणि काजूचा घास निसर्गाने हिरावला आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
पेण तालुक्यात दरवर्षी आंबा आणि काजूचे जवळपास ६० टक्के उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी जास्त प्रमाणावर पीक येण्याचे आशा शेतकऱ्याला होती. अशाताच, जानेवारी महिन्यात वाढलेला थंडीच्या प्रवाहाने उत्पादनाला पटका बसला होता. अशातच, आता अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शासनाच्या आदेशानुसार कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच पंचनामे सुरू करण्यात आले आहे.आंब्याचे ६५० हेक्टर आणि काजूचे ३० हेक्टर पीक घेतले आहे. त्यामुळे दोन्ही पिकांचे मिळून जवळपास ७०० हेक्टर पिकांचे पंचनामे कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. शासनाने प्रति हेक्टर २२ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली केली आहे. अशातच, अवकाळीचा फटका बसल्याने ही मदत पिकाच्या तुलनेत अल्प असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
जानेवारी महिन्यापासून बदलत्या वातावरणाचा विचार करता पेण तालुक्यातील आंबा आणि काजू या दोन महत्त्वाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनाम्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पूर्णपणे माहिती द्यावी. जेणेकरून शासनाकडून आपल्याला पुरेपूर नुकसान भरपाई देता येईल. तसेच या व्यतिरिक्त भाजीपालाबाबतही शेतकऱ्यांनी काळजी घेऊन कीड किंवा बुरशी लागू नये यासाठी एक दोन दिवसांत फवारणी करून घेणे अगदी गरजेचे आहे.
- सागर वाडकर, कृषी अधिकारी, पेण तालुका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.